महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी “नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना” सुरू केली आहे. या योजनेत सरकार शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत म्हणजेच पैसे देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जातात.
सहावा हप्ता म्हणजे काय?
या योजनेत सहाव्यांदा पैसे देण्याची वेळ आली होती. यासाठी सरकारने 29 मार्च 2025 रोजी योजना जाहीर केली होती. पण अजूनही खूप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहेत.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर सांगितले होते की,
“29 मार्चपासून 93.5 लाख शेतकरी कुटुंबांना पैसे दिले जातील. त्यासाठी सरकारने 2969 कोटी रुपये मंजूर केले आहेत.” हे पैसे थेट बँकेत जमा होणार होते.
हे ऐकून शेतकरी खूप खुश झाले होते.
पण प्रत्यक्षात काय झाले?
29, 30 आणि 31 मार्च या तिन्ही दिवशी बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर जाऊन तक्रारी केल्या.
सर्वांना वाटले होते की 31 मार्चपर्यंत पैसे मिळतील, पण तसे झाले नाही.
पैसे उशीर का झाले?
लोक विचार करत आहेत की जर सरकारने तारीख सांगितली होती, तर पैसे वेळेवर का आले नाहीत?
तज्ज्ञ सांगतात की मार्च महिना बँकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते. यामुळे त्या काळात बँकांमध्ये खूप काम असते. त्यामुळे थोडा गोंधळ होतो आणि पैसे पाठवायला उशीर होतो.
कृषीमंत्र्यांनी काय सांगितले?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की,
“सरकारने सगळी तयारी केली होती. 95 लाख शेतकऱ्यांना आधीच 1961 कोटी रुपये दिले आहेत. पण काही तांत्रिक अडचणी आल्या असतील, म्हणून उशीर झाला.”
ते म्हणाले की, सरकार सगळ्यावर लक्ष ठेवून आहे आणि लवकरच उरलेले शेतकरी सुद्धा पैसे मिळतील.
आता पुढे काय?
एप्रिल महिना सुरू झाला आहे. सरकार आणि कृषी विभागाने सांगितले आहे की, पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील, तर इतर शेतकऱ्यांना सांगा. आणि अजून आले नसतील, तर घाबरू नका. सरकार काम करत आहे. थोडा वेळ लागेल, पण तुमचे पैसे नक्की मिळतील